Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, घरातून4 मृतदेह आढळले

पुण्यात  संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, घरातून4 मृतदेह आढळले
, शनिवार, 14 जानेवारी 2023 (08:40 IST)
पुण्यातील मुंढवा भागातील केशव नगरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळून आला आहे. यामध्ये 24 वर्षीय मुलगा आणि 17 वर्षीय मुलीचा समावेश आहे. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सर्व मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.
 
कुटुंबातील चारही जणांनी एकत्र आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यूची माहिती लोकांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तर भारताचा अफगाणिस्तान होईल - चंद्रशेखर राव यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे टोला