सध्या पिंपरी चिंचवड मध्ये महिला पोलीस भरती सुरु आहे. या साठी एक महिला उमेदवार आपल्या तान्ह्या लेकराला घेऊन परीक्षेसाठी आली होती. महिलेचे बाळ रडत असल्याने पिंपरी चिंचवडच्या पोलीस दलातील एका महिला अंमलदाराने लेकराला सांभाळण्याचे काम केले. अशा मुळे महिला उमेदवाराला भरतीवर लक्ष केंद्रित करता आले. महिलेने नंतर पोलिसांचे मदत करण्यासाठी आभार मानले.
हे प्रकरण पुण्यातील पिंपरी चिंचवडचे आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरात पोलीस दलात 262 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. ही भरती इंद्रायणी नगर, भोसरी येथे संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात 19 जून ते 10 जुलै पर्यंत सुरु आहे. या पदासाठी 15 हजाराहून अधिक अर्ज आले आहे.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामुळे 25 जून ते 30 जून पर्यत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून आता 1 जुलै पासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. शनिवारी एक महिला उमेदवार आपल्या लहानग्या लेकराला कडेवर घेऊन भरती प्रक्रियेसाठी आली.
तान्हा बाळाला मैदानाच्या कडेला ठेऊन ती भरती प्रक्रियेच्या शारीरिक चाचणीसाठी गेली. तिला येण्यास उशीर झाला. तिचे तान्हे बाळ रडू लागले. हे मैदानात असलेल्या एका महिला पोलीस अंमलदाराने पाहिल्यावर तिने बाळाच्या जवळ जाऊन त्याला आपल्या कुशीत घेतले आणि बाळाला शांत केले.
बाळ शांत झालेलं पाहून महिला उमेदवाराला शारीरिक चाचणीकडे व्यवस्थित लक्ष देता आले. नंतर महिलेने महिला पोलीस अमंलदाराचे मदत केल्या बद्दल आभार व्यक्त केले. बालसंगोपन कर्तव्यावर तैनात असलेल्या महिला पोलिसांचे कौतुक होत आहे. स्त्रीचं दुःख फक्त स्त्रीच समजू शकते असं लोक म्हणतात. ते खरेच आहे.