Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात बॉम्ब ठेवल्याच्या फोन आल्याने खळबळ

threat call of bomb in pune
, गुरूवार, 5 मे 2022 (11:56 IST)
पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमुळे एकच घबराट उडाली. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसराची तपासणी केली, तेव्हा बॉम्बसदृश कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
 
पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचा फोन मंगळवारी सायंकाळी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात अज्ञाताने केला. एवढच नाही तर बॉम्ब ठेवल्याची जागा दाखवतो मात्र त्यासाठी सात कोटी रुपये द्यावे लागतील, असेही फोन करणाऱ्याने सांगितले. यामुळे एकच खळबळ उडाली.
 
अशा प्रकारचा फोन करुन अफवा पसरविणाऱ्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवारांना तिसरं समन्स