Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 13 March 2025
webdunia

धमकावून तरुणीवर बलात्कार

धमकावून तरुणीवर बलात्कार
पिंपरी , शनिवार, 18 डिसेंबर 2021 (20:08 IST)
जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून तरुणीचे न्यूड फोटो व व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपळे गुरव येथे बुधवारी (दि. १५ डिसेंबर) ही घटना घडली. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रथमेश खैरे याने तरुणीला पिंपळे गुरव येथे बोलावून घेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्याचे न्यूड फोटो व्हिडिओ काढले. त्यानंतर प्रथमेश याचा मित्र स्वराज कदम हा तेथे आला. स्वराज यांने देखील पीडित तरुणीशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर पीडित तरुणी सायंकाळी सहाच्या सुमारास तेथून निघून गेली.
 
त्यानंतर आरोपींनी रात्री दहाच्या सुमारास पुन्हा फोन करून तरुणीला येण्यास सांगितले. मी येत नाही, असे पीडित तरुणीने सांगितले. त्यावेळी तरुणीचा न्यूड व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली. त्याला घाबरून फिर्यादी पीडित तरुणी पुन्हा आरोपींकडे रात्री साडेअकराला पोहोचली. त्यावेळी आरोपी प्रथमेश आणि त्याच्या अनोळखी मित्राने देखील फिर्यादीची जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. पीडित तरुणीने याप्रकरणी पुणे येथील सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर हा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Omicronव्हेरियंटने जगाची चिंता वाढवली, WHO ने सांगितले - केसेस किती दिवसात दुप्पट होत आहेत