Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विक्रम गोखले यांचा जामीन अर्ज फेटाळला

विक्रम गोखले यांचा जामीन अर्ज फेटाळला
पुणे , बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (14:39 IST)
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा जमीन खरेदी फसवणूकप्रकरणी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. अभिनेते गोखले यांच्यासह जयंत म्हाळगी आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल आहे.
 
पुण्याजवळील गिरीवन प्रकल्पात मुळशी तालुक्यातील जमीन विक्रीत फसवणूक झाल्याचे हे प्रकरण पुण्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या डोंगरगावमधील शेतकर्यांच्या जमिनी बेकायदा विक्री केल्याचे हे प्रकरण आहे. यात गोखले यांच्यासह 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात जवळपास 97 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप जयंत बहिरट यांनी केला असून त्यांच्या तक्रारीवरून गोखले, जयंत म्हाळगी, सुजाता म्हाळगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळगी यांनी 25 वर्षांपूर्वी सुजाता फर्मा प्रा. लिमिटेड स्थापन करुन ‘गिरीवन प्रोजेक्ट' कंपनीची स्थापना केली. गोखले हे ‘गिरीवन प्रोजेक्ट'चे अध्यक्ष आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली कैपिटल्सचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा आयपीएलच्या इतिहासात असे काम करणारा पहिला गोलंदाज ठरला