Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

काय सांगता, हापूस आंबे आता EMI वर

What do you say Hapus Mango now on EMI
, रविवार, 9 एप्रिल 2023 (16:16 IST)
उन्हाळ्यात आंबा कोणी खाणार नाही असं शक्य नाही. पुण्यात सध्या आंबा महोत्सव सुरु  आहे. जगभरात प्रसिद्ध कोकणातील हापूस आंबे या महोत्सवात आले आहे.सध्या आंब्याची आवक कमी असल्यामुळे सर्वसामन्याला आंबे घेणे त्याच्या वाढत्या भावामुळे घेणं शक्य नाही. पुण्यात एका आंबा व्यावसायिकाने आंबे घेणं सर्व सामान्य नागरिकांना शक्य व्हावे या साठी आंबे चक्क ईएमआय वर देण्याची युक्ती काढत आपल्या दुकानावर आंबे ईएमआय वर मिळतील असा बोर्ड लावला असून या युक्तीचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.गौरव सणस असे या आंबा विक्रेताचे नाव आहे.गौरव हे अमेरिकेत व्यवसाय  करत आहे.हापूस आंब्याचे दर वाढले असल्यामुळे सर्व सामान्य माणसाला आंबे घेणं परवडत नसल्यामुळे कमी घेतात . त्यामुळे सर्व सामन्याला घेता यावं या साठी गौरवला हापूस आंबे EMI वर देण्याची भन्नाट कल्पना सुचली आणि त्यांनी चक्क आंबे EMI वर देण्याचा निर्णय घेतला आणि तशी जाहिरात दुकानावर बोर्ड लावून केली. त्यांची जाहिरात पाहून लोक EMI वर आंबा विकत घेत आहे.म्हणून म्हणतात 'पुणे तिथे काय उणे'          
 
 Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2023 :TV वरील पहिल्या IPL सामन्याला मिळाले 40 टक्के कमी जाहिरातदार, डिजिटलने केली मोठी खळबळ