पुण्याच्या कोथरूड परिसरात रानगवा महात्मा सोसायटीच्या भरवस्तीत घुसला. यावेळी अनेकांची पळापळ झाली. दरम्यान, कुत्र्यांच्या हल्ल्यात हा रानगवा जखमी झाला आहे. तर त्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि महापालिकेचे पथकाने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले होते. अखेर सहा तासांच्या नाट्यानंतर या रानगव्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.
पुण्याच्या कोथरुड भागात आढळलेला रानगवा शहराच्या दिशेने पळाला. वनविभागाला चकवा देत रानगवा पळालाय. ५० ते ६० जण गव्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. दाट लोकवस्तीच्या कोथरुड डेपो परिसरात रानगवा आढळून आला आहे. तो बिथरला असून पळतांना त्याच्या तोंडाला जखम झाली आहे. दरम्यानस तो २० ते ३० मिनिटे सातत्याने पळत होता. त्यामुळे तो थकलेला दिसत होता.
रानगवा थेट सोसायटी परिसरात आल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसल्यानंतर एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला होता.