सध्या लग्नाच्या आधी प्री वेडिंग शूट केले जाते. वधूला भावी वर आवडला नाही तर तिने त्याला मारण्याची सुपारी देण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.
श्री गोंडा तालुक्यात अहिल्यानगर येथे एका तरुणीचे लग्न कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील एका तरुणाशी ठरले. दोघांचा साखरपुडा देखील झाला. दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारी सुरु केली. लग्नाच्या आधी प्री वेडिंग शूट झाले. सगळे काही सुरळीत असताना तरुणीने तिचा विचार बदलला तिला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते लग्न मोडल्यावर बदनामी होऊ नये म्हणून तिने त्याला संपवण्याचा विचार केला आणि चक्क त्याला ठार मारण्यासाठी सुपारी दिली.
सागर नावाच्या मुलाचे लग्न ठरले मात्र भावी वधूने त्याला मारण्यासाठी सुपारी दिली.सागर हा एका हॉटेल मध्ये स्वयंपाकी म्हणून कामाला आहे. 27 फेब्रुवारी संध्याकाळी 7 :30 वाजेच्या सुमारास तो कामावरून परत येत असताना दौंड तालुक्यातील खामगाव फाट्याजवळील यवत पोलीस हद्दीतील एका हॉटेल जवळ काही लोकांनी सागरला अडवले.
हल्लेखोरांनी त्याच्यावर काठीने हल्ला केला आणि बेदम मारहाण करायला सुरु केली. आणि हल्ला केल्यावर तिथून त्याला जखमी अवस्थेत टाकून पळाले. सागरने स्वतःवर नियंत्रण मिळवून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शोध घेऊन या कटाचा पर्दाफाश केला आणि या प्रकरणी पाच जणांना अटक केली. या नंतर तरुणी मात्र फरार झाली. वधूचा शोध सुरु आहे.