साहित्य : 4 अमेरिकन कार्न, 1 लहान चमचा बटर, मीठ चवीनुसार, तिखट आवडीनुसार, 4 लहान चमचे चाट मसाला, पाव वाटी लिंबाचा रस.
कृती : सर्वप्रथम प्रेशर कुकरमध्ये बटर गरम करून त्यात भुट्टे घालून चांगले हालवून घ्यावे व त्यात 1/2 वाटी पाणी घालून कुकरचे झाकण लावून 2-3 शिटा होऊ द्या.
रसा तयार करण्यासाठी : लिंबाच्या रसात तिखट, मीठ आणि चाट मसाला घालून चांगले एकजीव करावे, आवडत असल्यास थोडे लोणीसुद्धा घालू शकता.
भुट्टे उकळ्लयावर त्यांना लिंबाच्या रसाने तयार केलेल्या रस्यात चांगल्याप्रमाणे चोळून घ्यावे, आणि गरम गरम भुट्टे सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा