साहित्य : 2 वाटी मक्याचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी कणीक, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा आल्याची पेस्ट, 1 चमचा लसणाची पेस्ट, 1 चमचा जिरेपूड, चवीनुसार तिखट, मीठ, हळद अंदाजे, 1/2 लहान चमचा ओवा, 1 चमचा तीळ, शेकण्यासाठी तेल.
कृती : मक्याचे पीठ, बेसन, कणीक तिन्ही पीठ मिसळून घ्या. चवीनुसार तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, ओवा, तीळ व आले पेस्ट घालून कोमट पाण्याने पीठ भिजवून घ्या. कोथिंबीर घाला. चांगले मळून लहान लहान आकारात गोळे बनवा. नंतर पराठे बनवून गरम तव्यावर शेकून घ्या. दही व लोण्यासोबत सर्व्ह करा.