Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यसभेचा भाजपचा दुसरा उमेदवार कोल्हापूरचा ?

voting
, बुधवार, 25 मे 2022 (09:12 IST)
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या चर्चांना अखेर शिवसेनेने पूर्णविराम दिला आहे. शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी देणार की नाही यावर तर्क-वितर्क लढवले जात असताना अखेर कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत  यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. तर शिवसेनेच्या पाठोपाठ भाजप ही आपला दुसरा उमेदवार कोल्हापूरच देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून संभाजीराजे छत्रपती मैदानात उतरणात आहेत. त्यांनी महाविकास आघाडीकडे पाठिंबाही मागितला होता. पण शिवसेनेने सेनेत प्रवेश करा त्यानंतरच उमेदवारी देऊ असा पवित्र घेतल्याने आणि संभाजीराजे यांनी शिवसेनेची ही ऑफर नाकारल्याने अखेर शिवसेनेने कोल्हापूर शिवसेना जिल्हा अध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे संभाजीराजे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना भाजपनेही आपला दुसरा उमेदवार कोल्हापूरचा असेल यासाठी धनंजय महाडिक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.
 
भाजपने राज्यसभेसाठी पहिले उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री पियूष गोयल (piyush goyal) यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. तर भाजपचे दुसरे उमेदवार म्हणून धनंजय महाडिक (dhananjaya mahadik) यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती भाजपमधील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तसेच तिसरा उमेदवार द्यायचा की नाही, याबद्दल अजून चर्चा सुरू आहे. मतांची गोळा बेरीज करून तिसऱ्या जागेवर निर्णय घेतला जाणार आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपला १३ मते कमी पडत आहे. पण, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज आहे. भाजपला फक्त १३ मतांची गरज आहे.
 
कोल्हापूर जिल्ह्यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधला असून धनंजय महाडिक यांच्याकडे ती कामगिरी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला मजबूत करण्यासाठी धनंजय महाडिक एक चांगला पर्याय असल्याचे बोलले जात आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील आदर्श अंगणवाड्यांचा कायापालट लवकरच – मंत्री ॲड.यशोमती ठाकूर