Dharma Sangrah

Raksha Bandhan : असावं हे बंधन खऱ्या प्रेमाचे

rakhi
असावं हे बंधन खऱ्या प्रेमाचे,
एकमेकां विषयी च्या कळकळीचे,
नको असूया असावं प्रेमच ओतप्रोत,
एकाच बागेतील फुलं आपण आहोत,
आठवावं फक्त बालपण सदैव आपण,
निरागसते नी साजरा करत होतो सण,
देवाणघेवाणी ची नव्हती च न चिंता,
आनंदच सोबतीला तेव्हां आपल्या होता.
धावून जावं एकमेकांकडे अडीअडचणी ला,
हेच आश्वासन आज हवंय या राखी ला!!
..अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Raksha Bandhan 2023 Muhurat राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या