Raksha Bandhan 2023 date muhurat timing रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा तिथी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:58 वाजता सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07:14 वाजता समाप्त होईल. भद्रकाल सकाळी 10:58 ते रात्री 09:01 पर्यंत असेल. अशात रात्री 09:01 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 07:14 च्या दरम्यान राखी बांधता येऊ शकते.
गोंधळ का आहे?
परंपरेनुसार श्रावण पौर्णिमेला राखीचा सण साजरा केला जातो.
पौर्णिमा तिथी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:58 वाजता सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07:14 वाजता समाप्त होईल.
पौर्णिमेचा पूर्ण कालावधी 30 ऑगस्ट रोजी असेल.
30 ऑगस्ट रोजी पौर्णिमा व्रताचा दिवस असेल आणि 31 ऑगस्ट रोजी स्नान दान पौर्णिमा असेल.
यावेळी 30 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या दिवशी भद्रा काळ असेल.
भद्रा सकाळी 10:58 ते रात्री 09:01 पर्यंत असेल.
भद्राचा वास पृथ्वीवर असताना कोणतेही शुभ कार्य करता येत नाही.
यावेळी भद्राचे वास्तव्य पृथ्वीवरच आहे.
अशा परिस्थितीत 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:58 ते रात्री 09:01 या वेळेत राखी बांधता येणार नाही.
काही अभ्यासकांच्या मते, रात्री 09:01 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 07:14 च्या दरम्यान राखी बांधली जाऊ शकते.
देशात अनेक ठिकाणी हा सण उदया तिथीनुसार म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.
30 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याची शुभ वेळ:- रात्री 9:01 ते 11:13 पर्यंत. (शुभानंतर अमृत चोघडिया)
31 ऑगस्टला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त :-
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त या दिवशी सकाळी 7.05 मिनिटापर्यंत आहे. यानंतर पौर्णिमा संपेल.
अमृत मुहूर्त सकाळी 05:42 ते 07:23 पर्यंत.
या दिवशी सकाळी सुकर्म योग असेल.
या मुहूर्तांमध्ये राखीही बांधता येते-
अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:14 ते 01:04 पर्यंत.
अमृत काल: सकाळी 11:27 ते 12:51 पर्यंत.
विजय मुहूर्त: दुपारी 02:44 ते 03:34 पर्यंत.
संध्याकाळी : 06:54 ते 08:03 पर्यंत.