Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रक्षा बंधनाचे हे 5 सत्य जे आपणांस ठाऊक नसतील...

रक्षा बंधनाचे हे 5 सत्य जे आपणांस ठाऊक नसतील...
, शुक्रवार, 17 जुलै 2020 (19:26 IST)
दरवर्षी रक्षाबंधनाचा सण श्रावणमहिन्याच्या पौर्णिमेला येतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी यासाठी बांधतात की त्यांचे सर्व प्रकाराने संरक्षण होईल आणि भाऊ बहिणीला भेट देऊन तो तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. चला जाणून घेऊ या, या सणासुदीबद्दलचे अशे 5 सत्य जे आपणांस कदाचित ठाऊक नसणार. 
 
1 "रक्षासूत्र" बांधण्याची परंपरा वैदिक काळापासून चालत येतं आहे जेव्हा माणसाला यज्ञ, युद्ध, शिकार, नवे संकल्प आणि धार्मिक विधींच्या वेळी मनगटावर 'माउली' नावाचा धागा बांधतात. हे संरक्षण सूत्र नंतर पती-पत्नी, आई-मुलगा आणि मग भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक बनले. रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात जे वेदातील संस्कृत शब्द 'रक्षिका'चा अपभ्रंश आहेत.
 
2 भविष्य पुराणात असे लिहिलेले आहे की देव आणि दानवांमध्ये जेव्हा युद्धाची स्थिती झाली आणि दानव देवांवर आधिपत्य गाजवू लागले अशा परिस्थितीत  देवतांचा पराभव बघून देवराज इंद्र घाबरून ऋषी बृहस्पती जवळ गेले. तेव्हा बृहस्पतींच्या सांगण्यावरून इंद्राच्या पत्नी इंद्राणी(शची)ने रेशीमाचा एक दोरा मंत्रांच्या सामर्थ्याने पवित्र करून आपल्या नवऱ्याच्या हाताला बांधून दिला. योगायोगाने तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. परिणामी इंद्र विजयी झाले. असे म्हणतात की तेव्हा पासूनच बायका आपल्या नवऱ्याचा मनगटाला युद्धात विजय मिळविण्यासाठी राखी बांधू लागल्या.
 
3 स्कन्द पुराण, पद्मपुराण आणि श्रीमद्भागवत पुराणानुसार जेव्हा भगवान वामनाने महाराजा बलीकडे 3 पाउले जमीन मागितल्यावर त्यांना पाताळलोकाचा राजा बनविले, तेव्हा राजा बलीने देखील वचनानुसार भगवंतांकडून दिवस-रात्र आपल्या समोर राहण्याचे वचन घेतले. देवाला सुद्धा वामनावतारानंतर पुन्हा लक्ष्मीकडे जायचे होते. पण भगवान वचन देऊन स्वतःच अडकून गेले आणि पाताळातच राहून बलीच्या सेवेत राहू लागले. इथे देवी लक्ष्मी या गोष्टींमुळे काळजीत पडल्या. अश्या वेळेस नारदाने लक्ष्मीजीना एक तोडगा सांगितला. तेव्हा देवी लक्ष्मीने राजा बलीला राखी बांधून आपले भाऊ बनविले आणि आपल्या नवऱ्याला आपल्या सोबत घेउन आल्या. तो दिवस देखील श्रावण महिन्यातील पौर्णिमा असे. तेव्हा पासूनच हे रक्षाबंधनाचे सण प्रचलित आहे. 
 
4 जैन धर्माच्या मान्यतेनुसार उज्जयिनी नगराचे राजा श्रीवर्माचे मंत्री बली नमुची, बृहस्पती आणि प्रह्लाद होते. या चारही जणांना जैन मुनींच्या अपमानामुळे राज्यातून हद्दपार करण्यात आले होते. तेव्हा हे चारही मंत्री तेथून निघून हस्तिनापुरात पोहोचले. तिथे त्यांनी राजा पद्मरायांकडून नोकरी मिळविली. बली नावाच्या मंत्रीने राजा पद्मरायांचा विश्वास संपादन करण्यासाठी मुत्सद्देगिरी आणि युक्तीने एका बंडखोर राजाला त्याचा स्वाधीन केले. यावर खूश होऊन राजा पद्मरायाने त्याला वर मागण्यास सांगितले. तो राजाला म्हणाला - राजन वेळ आल्यावर मी आपल्याकडून मागून घेईन.एकदा अकंपनाचार्य मुनी आपल्या 700 शिष्यासह हस्तिनापुरात पोहोचतात. राजा पद्मराय हे एक विशेष जैन भक्त होते. त्याच काळात बळीने राजा पद्मरायाकडून आपले वर मागितले आणि म्हणाला की मला 7 दिवसासाठी राजा बनवा. अश्या प्रकारे बळीने अकंपनाचार्य मुनी आणि त्यांचा 700 शिष्यांना राहत्या जागी कुंपण घालून आगीत ठार मारण्याची योजना आखली. तेव्हा विष्णुकुमार मुनीने ब्राह्मणाचा वेष धरून राजा बलीकडे तीन पाउले जमीन मागितली. त्याच वेळी बळीने यज्ञ थांबवून मुनींना उपसर्गापासून लांब केले. राजा देखील मुनींच्या दर्शनास तेथे गेले. हा दिवस देखील श्रावण महिन्यातील पौर्णिमेचाच होता. या दिवशी मुनींचे संरक्षण झाले. हा दिवस लक्षात राहण्यासाठी लोकांनी हातात सुताचे दोरे बांधले.
 
5 एकदा भगवान श्रीकृष्णाचा हाताला दुखापत झाली आणि रक्तस्त्राव होऊ लागले. हे सर्व द्रौपदी बघू शकली नाही आणि द्रौपदी ने लगेच आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधून दिले. जेणे करून रक्तस्त्राव थांबले. काळानंतर जेव्हा दुःशासन ने द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करीत असताना श्रीकृष्णानेच वस्त्र वाढवून आपल्या या बंधनाचे ऋण फेडले. हे प्रसंग देखील  रक्षाबंधनाच्या महत्वाला सांगतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळागौरीच्या व्रत-कैवल्यासह वाचा ही पौराणिक कहाणी