3 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल. रक्षा बंधन या सणानिमित्त बहीणी आपल्या भावांच्या हातावर राखी बांधतील. हा सण भाऊ-बहिणीतील प्रेमाचं प्रतीक असल्याचं म्हटलं जातं.
तीन ऑगस्ट रोजी रक्षाबंधन या दिवशी श्रवण नक्षत्र असणे महा शुभफलदायी मानले जात आहे. या नक्षत्रात भावाच्या मनगटीवर रक्षासूत्र बांधल्याने भाऊ, बहीण दोघांसाठी हे दीर्घायु आणि सुख- समृद्धिचे कारक मानले गेले आहे.
जाणून घ्या शुभ मुहूर्त
रक्षा बंधन 2020 मुहूर्त
राखी बांधण्याचा मुहूर्त : 09:27:30 ते 21:11:21 पर्यंत
अवधि : 11 तास 43 मिनिटं
रक्षा बंधन अपराह्न मुहूर्त : 13:45:16 ते 16:23:16 पर्यत
रक्षा बंधन प्रदोष मुहूर्त : 19:01:15 ते 21:11:21 पर्यत
पौर्णिमा तिथी आरंभ – 21:28 (2 ऑगस्ट)
पौर्णिमा तिथी समाप्त- 21:27 (3 ऑगस्ट)