Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बहिण भावाला राखी का बांधते, राखी बांधण्याची 5 पौराणिक कारणे

बहिण भावाला राखी का बांधते, राखी बांधण्याची 5 पौराणिक कारणे
, बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (09:56 IST)
रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. पण कधी आपण विचार केला आहे का या दिवशी बहिण भावाला राखी बांधते, कधी भाऊ बहिणीला राखी का बांधत नाही. तर चला जाणून घ्या 5 पौराणिक कारण ज्यामुळे ही परंपरा सुरु झाली-
 
1. भाऊ बहिणीच्या रक्षणाचे आश्वासन देतो तर बहिण रक्षा सूत्र बांधून भावाच्या रक्षेची कामना करते. या निमित्ताने भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. असे मानले जाते की राजसूय यज्ञ होत असताना भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षा सूत्र रुपात आपल्या वस्त्रातून एक तुकडा बांधला होतो. यांनतरच बहिणीकडून भावाला राखी बांधण्याची परंपरा सुरु झाली.
 
2. सर्वात आधी इंद्राच्या पत्नी शचिने वृत्तसुरसोबत युद्धात इंद्राच्या रक्षा करण्याच्या हेतूने रक्षा सूत्र बांधलं होतं. म्हणून जेव्हा कोणी युद्धावर निघत असतं तेव्हा त्याच्या मनगटावर मौली किंवा रक्षा सूत्र बांधून पूजा केली जाते. देवी लक्ष्मीने राजा बलिला आपला भाऊ मानत हातात आपल्या पतीच्या रक्षेसाठी बंधन बांधले होते आणि आपल्या बंधक पति श्रीहरि विष्णूंना सोबत घेऊन गेल्या होत्या.
 
3. रक्षा सूत्र घरात नवीन खरेदी केलेल्या वस्तू जसे वाहन, इतर वस्तूंना देखील बांधली जाते. पाळीव जनावरांना देखील राखी बांधली जाते. वस्तू किंवा पशू सुरक्षित राहावे ही यामागील भावना असते.
 
4. मौलीमुळे होते रक्षा : राखी किंवा मौलीला मनगटावर बांधल्यावर कलावा किंवा उप मणिबंध करतात. शास्त्रांप्रमाणे मौली बांधल्याने त्रिदेव- ब्रह्मा, विष्णु व महेश आणि तीन देवी- लक्ष्मी, पार्वती व सरस्वती यांची कृपा प्राप्त होते. मौली बांधून शुद्ध आणि शक्तिशाली बंधन असल्याची भावना निर्मित होते.
 
5. आरोग्यासाठी मौली : प्राचीनकाळापासूनच मनगट, पाय, कंबर आणि गळ्यात देखील मौली अर्थात लाल दोरा बांधण्याची परंपरा असून याचे चिकित्सीय लाभ देखील आहेत. शरीर विज्ञानानुसार याने त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ याचे संतुलन राहतं. वैद्य आणि कुटुंबातील वयस्कर लोक हात, कंबर, गळा आणि पायाच्या अंगठ्यात मौली वापरत होते जे शरीरासाठी उपयोगी ठरतं होतं. ब्लड प्रेशर, हार्टअटॅक, डायबिटीज आणि अर्धांगवायू सारख्या आजारांपासून बचावासाठी मौली बांधणे फायद्याचे सांगितले गेले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुत्रदा एकादशी महात्म्य