Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Raksha Bandhan 2021: 6 फॅशन टिप्स फेस्टिव्ह लुक करेल स्टाइलिश

Raksha Bandhan 2021: 6 फॅशन टिप्स फेस्टिव्ह लुक करेल स्टाइलिश
, शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (12:41 IST)
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या ट्रेडिशनल पोशाखात खास दिसू शकता, यासाठी तुम्ही काही प्रभावी टिप्स अवलंबू शकता. त्यासाठी तुम्ही खूप महागडा ड्रेस खरेदी करा हे आवश्यक नाही. या दिवशी जर तुम्हालाही तुमच्या लुकमध्ये थोडासा बदल करून तुमची राखी खास बनवायची असेल तर या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
 
ब्राइट कलरचा पोशाख घाला किंवा राखीनुसार आपल्या लग्नाचा किंवा एखाद्याच्या लग्नासाठी तयार केलेला ड्रेस री-वर्क करवू शकता.
 
ब्राइट कलर्स जसे रॉयल ब्लू, डार्क मरून, रेड, पेरट ग्रीन, फुशिया पिंक या सारखे रंग राखीला छान उठून दिसतात. या रंगाची साडी, सूट किंवा लेहेंगा तुम्हाला खूप शोभेल. ब्लिंग कुर्ता आणि बंधाणी दुपट्टे यासह चूडीदार युनिक लुक देईल. यासह झुमकी इयरिंग्स आणि हल्का मेकअप स्टाइलिश लुक देईल.
 
इंडो वेस्टर्न लुक हवा असल्यास ब्लिंग टॉप यासह एथनिक सिल्क शर्ट घाला. यासह चुनरी ऑप्शन म्हणून ठेवू शकता. 
 
वेस्टर्न फील हवं असल्यास एथनिक वियरमध्ये आपण इक्कत लॉग कुर्ता कॅरी करु शकता. यासह मोठे झुमके आणि रस्टिक सिल्वर नेकपीस सूट करेल.
 
लग्नात घातल्या जाणार्‍या ड्रेसला या सणासाठी इंटेलिजेंट प्रकारे यूज करु शकता. उदाहरणार्थ, तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर प्लेन जॉर्जेट किंवा शिफॉन साडीसह हेवी किंवा प्रिंटेट ब्लाउज घालू शकता. जर ब्लाउज कॉर्सेट असेल तर ते जॉर्जेट किंवा शिफॉनसह हेवी बॉर्डर फॅब्रिक घातले जाऊ शकते. तुम्ही त्याला पार्टी आउटफिटसोबत जोडू शकता.
 
आपण आपल्या लग्नाचा दुपट्टा किंवा हेवी चुनरी साध्या किनारी सूटसह कॅरी करु शकता. हा लुक तुम्ही क्लासिक घडी आणि पार्टी क्लचसह घालू शकता. किंवा हा दुपट्टा शॉर्ट ट्यूनिक आणि पॅलाझो पॅन्टसह जोडला जाऊ शकतो.

लहंगा प्लेन रॉ सिल्क ब्लाउज किंवा कॉरसेटसह घालू शकता. यासह दुपट्टा खूप कमी नक्षीदार असावा. त्याचे तसेच कमी दागिने घाला आणि लुक पूर्ण करण्यासाठी पार्टी क्लच कॅरी करा.

हा राखी सण विशेष बनवा आणि आपल्या कुटुंबासह सुरक्षितपणे साजरा करा. नक्कीच कोरोना व्हायरसमुळे सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल झाला आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्या सणाने आपली चमक गमावली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

FYJC 11th Admission : अकरावी प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या