Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामनवमी: या प्रकारे साजरा करा जन्मोत्सव

webdunia
आपण आर्थिक समस्यांमुळे परेशान असाल तर रामनवमी आपल्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. या रामनवमीला सामान्य विधी-विधानाने परंतू मनोभावे आणि चित्त लावून पूजा केल्याने निश्चितच आपल्याला अपार धन संपदाची प्राप्ती होऊ शकते.
 
* रामनवमीला प्रभू श्रीरामाची मनोभावे पूजा-अर्चना करावी.
 
* नवीन घर, दुकान किंवा प्रतिष्ठानात पूजा-अर्चना करून प्रवेश करावे.
 
* या दिवशी देवी दुर्गाच्या नवम स्वरूप सिद्धिदात्रीची उपासना करून आपल्या सामर्थ्यानुसार देवीच्या नावाचे 9 दीप प्रज्वलित करावे.
 
* गरीब-असहाय लोकांना आपल्या सामर्थ्यानुसार दान-पुण्य करावे. विशेष म्हणजे मिष्टान्न वितरित करावे.
 
* राम जन्मोत्सव या प्रकारे साजरा करा ज्या प्रकारे घरात मुलं जन्माला आल्यावर आनंदी वातावरण निर्माण केलं जातं.
 
* नवमीच्या दिवशी कुमारिकांना भोजनासाठी आमंत्रित करावे. मंदिरावर केशरी ध्वज चढवावे.
 
* कुमारिकांना भेटवस्तू द्यावी. पिवळे फुलं, पिवळ्या बांगड्या आणि पिवळे वस्त्र देणे अधिक उत्तम ठरेल.
 
* कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यासाठी हा दिवस श्रेष्ठ मानला गेला आहे. म्हणून घरात मंगल कलश पूजन करून सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी.
 
* श्रीराम नवमीला रामरक्षास्त्रोत, राम मंत्र, हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदर कांड इतर पाठ केल्याने पुण्य लाभतं आणि धन-संपत्ती वाढते.
 
* प्रभू श्रीरामाची सहकुटुंब पूजा करावी. विजय कामना असल्यास रामाचा धनुष्य घेतलेल्या स्वरुपाची पूजा करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवी दुर्गाचे 108 नावं, देतात हजार पटीने सुख-समृद्धीचे वरदान