Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुराण शब्द कुठून आला?

कुराण शब्द कुठून आला?
, शनिवार, 4 मे 2019 (11:29 IST)
मुस्लिमांचा पवित्र धमर्ग्रंथ म्हणून कुराणकडे पाहिले जाते. कुराण हा शब्द नेमका कुठून आला याबद्दल एकमत नाही. परंतु, अरेबिकमध्ये क्वारा या शब्दाचा अर्थ 'आठवणे' असा सांगितला जातो, त्यावरून कुराण शब्द आला असावा. 
 
सिरियन भाषेत कुराने म्हणजे वाचणे असा अर्थ होतो. त्यामुळे हा शब्द त्या भाषेतून आला असावा असेही एक मत मांडले जाते. प्रेषित मोहम्मद यांना परमेश्वराने दिलेल्या दिव्य संदेशांचे एकत्रीकरण म्हणजे कुराण होय. 
 
विशेष म्हणजे पैगंबरांच्या हयातीत कुराण लिहिले गेले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी प्रवचनातून दिलेल्या संदेशांचे एकत्रीकरण करण्यात आले. कुराणाची सध्याची प्रत तयार करण्याचे श्रेय तिसरा खलिफा उथमान यांना जाते. 
 
पैगंबरांच्या मृत्यूनंतर प्रत्येकजण आपल्यापरिने कुराणाचा अर्थ लावू लागला. त्यामुळे या खलिफाने एक समिती नेमली. झैद इबन थबित हे पैगंबरांचे लेखनिक होते. त्यांच्या मागर्दशर्नाख खली हे काम करण्यात आले. 
 
त्यानुसार सवर् आयते ११४ सुरांमध्ये गुंफण्यात आली. आता सवर्त्र हेच कुराण वाचले जाते. कुराणमध्ये स्वगार्चा आनंद कसा मिळविता येईल व कशामुळे नरक मिळेल याचे विवरण आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रमझानच्या महिन्यात पाळण्यात येणारे काही नियम