Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकादशीपर्यंत पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद

एकादशीपर्यंत पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद
पंढरपूर , मंगळवार, 28 जून 2016 (13:11 IST)
आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सुविधा बंद करण्यात आली आहे. वारीनिमित्त सध्या पंढरपुरात भाविकांचा ओघ वाढत चालला आहे.

 दररोज 60 हजार भाविक विठुरायाचं दर्शन घेतात. अशावेळी व्हीआयपी रांगेतील लोकांना सोडल्यानंतर भाविकांकडून याला विरोध होतो. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना ताटकळत उभं राहू लागतं. त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंदिर परिसरात कायमस्वरुपी दोन अँब्युलन्स तैनात करण्यात आल्यात. तर दर्शन मंडपात चोवीस तास सेवा देणाऱ्या दवाखान्याची सुरुवात करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'हाजीअली'साठी तृप्ती देसाईंनी घेतलं शनीदेवाच दर्शन