Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घृणास्पद : तीन वर्षीय पुतणीवरच दोन नराधम काकांनी बलात्कार केला

घृणास्पद : तीन वर्षीय पुतणीवरच दोन नराधम काकांनी  बलात्कार केला
, मंगळवार, 13 सप्टेंबर 2016 (17:08 IST)
स्वतःच्या तीन वर्षीय पुतणीवरच दोन नराधम चुलत्यांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर तालुक्यातल्या चांडेश्वर गावात झालाय. पाच सप्टेंबर रोजी घडलेला हा प्रकार सात दिवसानंतर उघडकीस आला. सात दिवसांपूर्वी शेजारीच राहणाऱ्या पिडित तीन वर्षीय मुलीच्या चुलत्यांनी तिला आमिष दाखवून घरात बोलावलं आणि दोघांनी मिळून चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना घडल्यापासून आजारी पडलेल्या मुलीला उपचारासाठी दवाखान्यात नेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील दोन आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असून दुसरा आरोपी अठरा वर्षीय आहे. या प्रकरणात लातूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करीत यातील एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तर दुसऱ्या अठरा वर्षीय आरोपीला अटक केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरात्रीसाठी आता खास शाकाहारी पिझ्झा