Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जॉब सिकर्स पेक्षा जॉब क्रिएटर्स ची संख्‍या वाढणे अत्‍यंत गरजेचे - सुधीर मुनगंटीवार

जॉब सिकर्स पेक्षा जॉब क्रिएटर्स ची संख्‍या वाढणे अत्‍यंत गरजेचे - सुधीर मुनगंटीवार
, बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (17:21 IST)
लघु व मध्‍यम उद्योगांमध्‍ये सर्वात जास्‍त रोजगार असल्‍याने जॉब सिकर्स पेक्षा जॉब क्रिएटर्स ची संख्‍या वाढणे अत्‍यंत गरजेचे आहे. मुठभर लोकांच्‍या हाती देशातील सा-या उत्‍पादनांची सुत्रे जाण्‍यापेक्षा हजारो लाखों लोकांच्‍या हाती उत्‍पादनांची सुत्रे जाणे ही देशाच्‍या आर्थीक प्रगतीच्‍या दृष्‍टीने अतिशय महत्‍वाची बाब आहे. यादृष्‍टीने बॉम्‍बे स्‍टॉक एक्‍सचेंज ने लघु व मध्‍यम उद्योजकांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर आयोजित करावे व त्‍यांच्‍या प्रगतीचा पाया भक्‍कम करावा असे आवाहन वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 
 
बॉम्‍बे स्‍टॉक एक्‍सचेंज च्‍या वतीने एसएमई कंपनीच्‍या शुभारंभ कार्यक्रमात वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. नारायणी स्‍टील लिमी., रिध्‍दी स्‍टील अॅन्‍ड टयुब्‍स लिमी., स्‍प्रेकींग अॅग्रो इक्‍वीपमेंट्स या कंपन्‍यांचे रजिस्‍ट्रेशन बॉम्‍बे स्‍टॉक एक्‍सचेंज मध्‍ये एसएमई म्‍हणून करण्‍यात आले. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक, स्‍टार्ट अप, स्‍टॅन्‍ड अप, मेक इन इंडिया या सारख्‍या रोजगारक्षम योजना सुरू केल्‍या आहेत. या योजना जास्‍तीत जास्‍त लोकांपर्यंत पोहचण्‍याच्‍या दृष्‍टीने बॉम्‍बे स्‍टॉक एक्‍सचेंज सारख्‍या 140 वर्षे जुन्‍या व अनुभवी संस्‍थेने पुढाकार घेणे अत्‍यंत गरजेचे आहे. ही संस्‍था ओल्‍डेस्‍ट पण फास्‍टेस्‍ट अशी संस्‍था आहे. या संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन लघु व मध्‍यम उद्योजकांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर आयोजित केल्‍यास त्‍याचा निश्‍चीतच या क्षेत्राला फायदा होईल. 1650 मध्‍ये आपल्‍या देशाचा जीडीपी जगाच्‍या जीडीपी पैकी 25 टक्‍के होता. एवढी श्रीमंती भारतात होती. भारत ख-या अर्थाने सुजलाम सुफलाम व समृध्‍द देश होता. मात्र आक्रमणका-यांनी व इंग्रजांनी या देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेची वाट लावली. मात्र आज ते सुवर्णदिन आपण सर्व एकत्र येवून परत आणू शकतो. भारत देश जगाचा कर्णधार होवू शकतो एवढी क्षमता आपल्‍यात आहे. ही क्षमता ओळखत सर्वांनी एकत्र येवून देशाची अर्थव्‍यवस्‍था बळकट करण्‍यात योगदान देण्‍याचे आवाहन वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 
webdunia
यावेळी मंचावर बॉम्‍बे स्‍टॉक एक्‍सचेंज चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष चौहान, श्री. बाला व्‍ही., श्री. अजय ठाकुर, श्री. महावीर लुनावत, श्री. कमल कोठारी, श्री. रितेश ढोलहागरा,श्री. सुनिल चौधरी, श्री. राजेश मित्‍तल आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.  बॉम्‍बे स्‍टॉक एक्‍सचेंज च्‍या वतीने वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्‍कार करण्‍यात आला. या कार्यक्रमाला लघु व मध्‍यम उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा खून