Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रबोधन मंडळ संस्थेतर्फे गणेश आगमनावर एक भव्य स्पर्धेचे आयोजन

प्रबोधन मंडळ संस्थेतर्फे गणेश आगमनावर  एक भव्य स्पर्धेचे आयोजन
मुंबई , सोमवार, 5 सप्टेंबर 2016 (16:55 IST)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘सुखकर्ता-दु:खहर्ता’ असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. सर्व घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पाचे स्वागत मोठ्या थाटामाटात होणार आहे. गणेश भक्तांचे कलात्मक प्रोत्साहन वाढविण्यासाठी मालाडच्या शिवसमर्थ प्रबोधन मंडळ संस्थेने गणेश आगमनावर आधारित एक भव्य स्पर्धा आयोजित केली आहे. गणेश भक्तांनी आपल्या घरगुती किंवा सार्वजनिक गणपती बाप्पाचे आगमन मोबाईल किंवा कॅमेराने चित्रित करून त्याचा 1 ते 2 मिनिटांची शॉर्टफिल्म किंवा म्युझिक व्हिडियो बनवायचा आहे. व्हिडियो प्रवेशिका 9 सप्टेंबर पर्यंत स्वीकारली जाईल. स्पर्धेत 
जिंकणाऱ्याला भव्य आकर्षक चषक, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शशिकांत कोरी (8879007923) आणि प्रशांत माधव कदम (9920017045) तसेच [email protected] ह्या इमेल आयडी वर संपर्क करता येईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्लीत जन्म झाला करजईंच्या मुलीचा