Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भर पावसात पंढरीत अतिक्रमण हटाव

भर पावसात पंढरीत अतिक्रमण हटाव
पंढरपूर- आषाढीच्या तोंडावर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्यात आली असून मुख्यधिकारी अभिजित बापट यांनी मोठय़ा पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर थाटलेल्या दुकानांचा माल जप्त केला. पाऊस सुरू असतानाच ही कारवाई करण्यात आली.
 
मागील आठवडय़ापासून नगरपरिषदेचवतीने अतिक्रमण काढण्याची सूचना केली जात आहे. याला व्यापार्‍यांनी दाद न दिल्यामुळे सोमवारी भर पावसात व्यापार्‍यांना कारवाईला सामोरे जावे लागले. मुख्यधिकारी बापट यांच्यासह शहर पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, वाहतूक पोलीस निरीक्षक नीलेश गोपाळचावडीकर, नगरअभिंता दिनेश शास्त्री यांनी विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, शिवाजी चौक आदी भागात मोठय़ा फौजफाटय़ासह अतिक्रमण काढले. पावसासाठी दुकानावर बांधण्यात आलेली पानसरे देखील काढल्यामुळे व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंडेंना फरार घोषित करणार