Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदी यांच्या भाषणांचा संग्रह ‘सबका साथ सबका विकास’

मोदी यांच्या भाषणांचा संग्रह ‘सबका साथ सबका विकास’
, गुरूवार, 15 सप्टेंबर 2016 (10:15 IST)
देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन पुण्याच्या अमेय प्रकाशन या संस्थेच्या ‘सबका साथ सबका विकास’ या पुस्ताकाचे प्रकाशन 17 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हेयातील बल्लायरपूर येथे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्तेच करण्यारत येणार आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यार स्फुपर्तीदायी भाषणांचा बहुमुल्य ठेवा ‘सबका साथ सबका विकास’ या पुस्तमकात असुन या माध्युमातुन वाचकांसाठी अच्छेम दिन येणार आहेत. बल्लाररपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मचदिनाचे औचित्यह साधुन दिव्यांकग व्यक्तींना कृत्रिम साधने पुरविण्याच्या दृष्टीदने आयोजित विशेष तपासणी शिबीरात वित्तरमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यार हस्तेय या पुस्तनकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दिनांक 17 सप्टेंधबर रोजी बल्लाररपूर येथील संत तुकाराम महाराज सभागृहात सकाळी 11.00 वा. या पुस्तटकाचा प्रकाशन सोहळा संपन्नी होईल. 
 
अस्थीकरता आणि अनागोंदीचं मळभ पुसुन त्याकजागी स्थिरतेचं चित्र रेखाटणारे, युवापिढीसमोर नवा आदर्श ठेवणारे, दिलेल्या‍ शब्दाला योग्ये कृतीची जोड देऊन विश्वासस निर्माण करणारे, जागतिक स्तुरावर भारताचा सन्मान राखणारे असे धडाडीचे, बहुआयामी नेते अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी. ज्या नेत्याच्या भारदस्ते विचारांमुळे आणि कृतीमुळे भारतामध्ये विकास आणि गतिमान प्रशासनाचं नवयुग अवतरलं, त्या‍ नरेंद्र मोदींच्या वेचक व वेधक भाषणांचा हा अत्यंचत वाचनीय संग्रह त्यांच्या जन्मीदिनी प्रकाशित होणार असुन या पुस्तवकाच्या प्रकाशन सोहळयाला नागरिकांनी मोठया संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन अमेय प्रकाशन पुणेचे प्रमुख उल्हास लाटकर यांनी केले आहे. या पुस्तककाचा मराठी अनुवाद अजय कौटिकवार, अमित मोडक यांनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आय फोन 7 चे प्री बुकिंग सुरु, 7 ऑक्टोबरला उपलब्ध होणार