Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मौजमजेसाठी गॅलरीतून खुलेआम गोळीबार!

मौजमजेसाठी गॅलरीतून खुलेआम गोळीबार!
नागपूर , शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016 (10:49 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमध्ये डब्बा ट्रेडिंग प्रकरणातील आरोपी धनदांडग्यांनी आपल्या घराच्या गॅलरीतून खुलेआम गोळीबार केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मौजमजेसाठी गोळीबार केल्याचं समजतं आहे. त्यामुळं नागपुरात आरोपींना पोलिसांचं भय राहिलं नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गॅलरीतून गोळीबार करणारे तरुण डब्बा ट्रेडिंग प्रकरणातील आरोपी असून रवी अग्रवाल आणि गोपी मालू अशी दोघांची नाव आहेत. घराच्या गॅलरीतून हे तरुण समोरच्या दिशेनं गोळीबार करत होते. डब्बा ट्रेडिंग प्रकरणातील आरोपी बिनधास्तपणे गोळीबार करतात आणि त्याचं मोबाईल शूटही करतात.या धनदांडग्यांनी मौजमजेसाठी गोळीबार केल्याचं समजतं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भुजबळ्यांच्या संपत्तीवर ईडीची टाच