राष्ट्रीय मालमत्तांना आधीच्या काँग्रेस सरकारांकडून गांधी, नेहरू यांची नावे देण्यात आल्याचे नमूद करत त्याला जोरदार आक्षेप घेणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सध्या काँग्रेसच्या निशाण्यावर असून सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क एका सार्वजनिक शौचालयाला ऋषी कपूर यांचे नाव देऊन आपला निषेध नोंदवला आहे.
सगळीकडे गांधी- नेहरूंची नावे द्यायला बापाचा माल समजलात का? असा सवाल ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला होता. यांच्या म्हणण्याचं अनेकांनी समर्थन केलं तसा त्याला तीव्र विरोधही झाला.
यामुळे ऋषी कपूर यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेरही कार्यकर्त्यांनी ऋषी यांच्या विरोधात निदर्शनही केली. अशीच निदर्शने सोलापुरात करून कार्यकर्त्यांनी चक्क शहरातील एका सार्वजनिक शौचालयाचं थेट ऋषी कपूर सार्वजनिक शौचालय असं नामकरण करून आपला निषेध नोंदवला.
शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. त्यांनी अभिनेते ऋषी कपूर यांच्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
अभिनेते मोदी सरकारकडून काही तरी पदरात पाडून घेण्यासाठी अशा प्रकाराच वक्तव्ये करी आहे असे त्यांचे म्हणणे होते.