Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हा एनडीएचा नव्हे तर भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार- राऊत

हा एनडीएचा नव्हे तर भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार- राऊत
, मंगळवार, 5 जुलै 2016 (15:57 IST)
मुंबई- मोदी सरकारने आज 19 नव्या चेहर्‍यांसह केलेल्या मंत्रिमंडळात विस्तार हा एनडीए सरकारचा नव्हे तर भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. "मंत्रिमंडाळात संधी देण्यात आलेले सर्व चेहरे हे भाजपमधील आहेत. त्यांनी अकाली दलाला किंवा तेलुगु देशमला निमंत्रित केले नाही. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सहभाग नसल्याची आम्हाला काहीही चिंता नाही‘, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. 
 
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत नाराज असलेले शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच ‘आमचा पक्ष कॅबिनेट मंत्रीपदासाठी लाचार होऊन कोणाजवळ जाणार नाही‘ असे म्हटले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

10 वर्षाच्या मुलाचे वजन 192 किलो, दुनियेतील सर्वात वजनी मुलगा