Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत वेळी भीषण अपघात10 महिला मृत्युमुखी

नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत वेळी भीषण अपघात10 महिला मृत्युमुखी
, शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (16:29 IST)
अनंत चतुर्दशीला सर्वत्र 10 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. नागपुरात गणपती विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. नागपुरात गणपती विसर्जनादरम्यान मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. 
 
नागपुरातील उमरेड परिसरात गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या वेळी ढोल ताशांच्या गजरांसह गणरायाची मिरवणूक निघाली. या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे अनेकांच्या अंगावर अचानक ठिणग्या पडल्या. या अपघातानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घाईघाईने पळून गेल्याने अनेक जण जखमीही झाले. गणपती विसर्जनाच्या वेळी फटाक्यांमुळे आठ ते दहा महिला दगावल्याचं सांगण्यात येत आहे.तर अनेक जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.व्हिडीओ मध्ये लोक विर्सजन मिरवणुकीत सम्मिलीत झाले आहे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघत आहे. अचानक मिरवणुकीत फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली. फटाक्यांची ठिणगी गर्दीत असलेल्या लोकांवर पडली आणि काही महिला होरपळल्या महिलांमध्ये गोंधळ उडाला आणि लोक पळू लागले. चेंगराचेंगरीची स्थिती झाली अनेक महिला जखमी झाल्या. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मशिदीत दोन पायांवर येईल, पण स्ट्रेचरवर जाईल, वारीस पठाण यांची नितेश राणेंना उघड धमकी