Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवणार्‍याला 10 वर्ष कारावास

jail
, गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (08:29 IST)
रत्नागिरी :संगमेश्वर तालुक्यातील 16 वर्षीय मुलीशी शरीरसंबंध ठेवून तिचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱया आरोपीला न्यायालयाने 10 वर्ष सश्रम कारावास व 5 लाख 35 हजार रुपये दंड ठोठावल़ा नितीन संजय जाधव (26, संगमेश्वर काटवली) असे आरोपीचे नाव आह़े त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 376, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 (पॉक्सो) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम नुसार दोषारोपपत्र ठेवण्यात आले होत़े
 
रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा सरकारी पक्षाकडून ऍड. मेघना नलावडे यांनी काम पाहिल़े खटल्यातील माहितीनुसार, जून 2017 मध्ये आरोपी नितीनने पीडित मुलीचा मोबाईल नंबर मिळवून तिच्याशी जवळीक साधल़ी ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही जून 2017 ते डिसेंबर 2017 दरम्यान तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केल़े  यावेळी नितीनने आपल्या मोबाईलमध्ये पीडित मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढल़े पीडित मुलीच्या मोबाईल क्रमांकाचे व्हॉटसऍप आपल्या मोबाईलमध्ये चालू करून त्यावर ते फोटो डाऊनलोड करून बदनामी केली, अशी तक्रार पीडित मुलीने देवरुख पोलीस ठाण्यात दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी नितीन याच्याविरूद्ध भादंवि कलम 376 (2) (आय) (जे) (एन), बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण अधिनिमय 2012 कलम 4, 12 व 14 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनिमय 2000 चे 66 ई व 67 नुसार गुन्हा दाखल केल़ा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनुष्यबाण शिवसेनेकडचं राहणार- संजय पवार