नाशिक लोकमान्य टिळक टर्मिनल-जयनगर एक्स्प्रेसचे (एलटीटी-जयनगर एक्सप्रेस) 11 डबे रविवारी दुपारी महाराष्ट्रातील नाशिकजवळ रुळावरून घसरले. नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या पुढे लहवित आणि देवळालीजवळ ही घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमी झालेल्याची माहिती अद्याप मिळाली नाही.
या अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातामुळे अनेक गाड्या रद्द करून मार्ग वळवण्यात आला आहे.
एएनआय वृत्तसंस्थेनुसार, मध्य रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले की, रविवारी (3एप्रिल) दुपारी 3.10 च्या सुमारास लहवित आणि देवलाली (नाशिकजवळ) दरम्यान डाऊन मार्गावरील 11061 एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले. अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन आणि मेडिकल व्हॅन घटनास्थळी पोहोचल्या.
अपघाताबाबत अपडेट गोळा करण्यात येत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.