Publish Date: Sat, 08 Apr 2023 (16:42 IST)
Updated Date: Sat, 08 Apr 2023 (16:44 IST)
येरमाळा येथून येडेश्वरी देवीच्या यात्रेतून परतताना पुणे- सोलापूर महामार्गावर मळद गावाच्या हद्दीत एका खासगी प्रवासी बसला टेम्पोने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या खासगी बस मध्ये एकूण 31 प्रवासी होते. या अपघातात पुण्यातील भवानीपेठेतील 11 भाविक गम्भीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल केले.