Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्या भीतीमुळे 11 वर्षीय बालिकेने केली आत्महत्या

त्या भीतीमुळे 11 वर्षीय बालिकेने केली आत्महत्या
सर्वाना लहानपणी डॉक्टर आणि त्यांचे इंजेक्शन यांची फार प्रचंड भीती असते, मात्र जसे वय वाढते तशी भीती निघून जाते. मात्र अश्याच भीतीने मुलीने आपला जीव घेतला आहे. तिच्या जीभेखाली गाठ असल्याने ती शस्त्रक्रिया करून काढावी लागणार असल्याची चर्चा ऐकून संभाव्य शस्त्रक्रियेच्या भीतीने घाबरलेल्या एका 11 वर्षीय बालिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरातील परळी वेस परिसरात  घडली आहे. प्रिया सुभाष लोंढे (वय 11, रा. शाहू नगर परळीवेस अंबाजोगाई) असे आत्महत्या करणाऱ्या चिमुरडीचे नाव आहे. 
 
काही दिवसांपुर्वी प्रियाच्या जीभेखाली गाठ तयार झाली होती. त्यामुळे तिला तिचे वडील डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. डॉकटरीं तिला तपासले. त्यावेळी ती गाठ शस्त्रक्रिया करून काढावी लागेल असे डॉक्टरांनी वडिलांना सांगितले. त्यांच्यातील संभाषण प्रियाने ऐकले. त्यानंतर आता आपल्यावर शस्त्रक्रिया केली जाणार या कल्पनेने तिला भिती वाटली. त्यामुळे या भितीपोटी तिने पत्र्याच्या आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आईने हे पाहिल्यावर आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुन्हा आनंदायक भविष्यवाणी, आठवड्यात येणार मान्सून देशात