जाती मुळे छळ करत डॉ. पायल तडवीला आत्महत्या करायला भाग पडणाऱ्या प्रकरणात आता आग्रीपाडा पोलीस ठाण्याकडून गुन्हे शाखेकड़े वर्ग करण्यात केला आहे. त्यामुळे गुन्हे शाखा पुढील तपास करणार असून, पायल तडवीआत्महत्या प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
पायाल यांनी २२ मे रोजी सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली केली होती, घटना घडली तेव्हापासून आग्रीपाडा पोलीस घटनेचा तपास करत होते. मात्र, या गुन्ह्याची गंभीरता आणि महत्व लक्षात घेता गुन्हे शाखेकडे पायलच्या आत्महत्येचा तपास वर्ग करण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला आहे.
आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपासासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने डॉक्टरांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यातील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, विचारवंत यांनी हे प्रकरण लावून धरले होते त्यामुळे पोलिसांनी यावर कारवाई केली आहे.