Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे आणि त्यामुळे झालेल्या मानिसक छळाला कंटाळून एका महिलेने शेवटी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला.
 
ही घटना पिंपरी येथील असून तिच्या सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
35 वर्षीय प्रियंका केदार पेटकर शरीराने जरा जाड होती यामुळे सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. जाड असल्यामुळे माहेरहून पैसे आणण्यासाठीही तिचा छळ करण्यात येत होता. माहितीनुसार तिच्यावर घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकला गेला. जाड असल्यानं होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून शेवटी तिने गळफास लावून आत्महत्या केली. 
 
या प्रकरणी प्रियंकाचा भाऊ पुष्कराज नंदकुमार प्रभुणे यांच्या फिर्यादावर पती केदार श्रीकांत पेटकर, सासू सुरेखा श्रीकांत पेटकर, सासरा श्रीकांत विश्वनाथ पेटकर आणि जगदीश माडीवाला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंकाने 26 मे रोजी माहेरी असताना आत्महत्या केली. याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स