Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गिरीश महाजन भावी मुख्यमंत्री राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

गिरीश महाजन भावी मुख्यमंत्री राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस यांच्या नंतर सर्वात दमदार नेता म्हणून गिरीश महाजन यांच्या कडे पहिले जाते. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे देशाचे लक्ष  आहे.त्यात आता राज्यात मात्र जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकांना महाजन यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याची स्वप्न पडू लागली आहे. 
 
गिरीश महाजन यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारे बॅनर जळगावात लावण्यात आले आहे. त्यामुळे, या विषयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातही खांदेपालटाचे जोरदार चर्चा  आहे.  केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिपदाची जबाबदारी नाकरली  त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच  फडणवीस यांच्या जागी गिरीश महाजन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते, असा विश्वास महाजन यांच्या समर्थकांना आहे. 
 
त्यांच्या समर्थकांनी जळगाव शहरात, महाजन यांना महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा प्रदान करणारे बॅनर लावले असावेत अंदाज वर्तवला जात आहे. मात्र यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे, तर दुसरीकडे चंद्रकांतदादा पाटील यांचे सुद्धा नाव अनेकदा मुख्यमंत्री म्हणून समोर येत होते. त्यामुळे आता खांदेपालट झाला तर पुढे काय होईल याचा निणर्य भाजपच घेणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदी मंत्रिमंडळात कोणत्या राज्यातून कोणते मंत्री, बघा यादी