Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयटी हब पुणे येथे महागड्या हॉटेलांवर कारवाई, वाचा कारण काय आहे

आयटी हब पुणे येथे महागड्या हॉटेलांवर कारवाई, वाचा कारण काय आहे
, बुधवार, 22 मे 2019 (09:42 IST)
पुणे हे राज्यातील सर्वात उत्तम शहर असून ते आयटी हब देखील आहे. त्यामुळे येथे अनेक उच्च शिक्षित आणि सर्वाधिक पैसे कमावणारे राहतात, त्यामुळे येथे विकएण्ड कल्चर जोरात आहे. त्यातच शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहर पोलिस आणि महापालिकेने संयुक्तरित्या सुरू केली आहे. 
 
दोन्ही विभागाने रहदारीस अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांवर जोरदार  कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये विशेषत: कोरेगाव पार्क, बाणेर सारख्या पॉश परिसरात रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या हॉटेल्सची अतिक्रमणे कारवाईच्या रडारवर आली आहेत. प्रामुख्याने इमारतीची साईड मार्जीन, ग्रंट मार्जीनमध्ये हॉटेल थाटून रस्त्यावरील बेकायदा पार्कींगला चालना देवून वाहतुकीला अडथळा आणणार्‍या हॉटेल्सवरील कारवाई केली जातेय. कोरेगाव पार्क परिसरातील अशा ५० हून अधिक तसेच बाणेर, बालेवाडी परिसरात टेरेसवर बेकायदा सुरू असलेल्या हॉटेल्सवर बांधकाम विभागाने धडक कारवाई केली आहे. 
 
कोरेगाव पार्क, कॅम्प आणि अलिकडे आयटी सेक्टरमुळे प्रकाश झोतात आलेल्या चांदणी चौक, बाणेर, बालेवाडी परिसरातील हॉटेल व्यावसायाला जोरात सुरु आहे.  हॉटेल्स विकेन्डला अक्षरश: गर्दीने ओसंडून वाहतात. उच्च वर्गाच्या नाईटलाईङ्गसाठी येथील रस्ते रात्री उशिरापर्यंत जागे असतात. अगोदरच रहादारी वाढलेल्या या रस्त्यांवर बेकायदा पार्कींग होत असल्याने वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे.महापालिका आयुक्त सौरभ राव आणि पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर शहरातील वाहतूकीच्या प्रश्‍नावर संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. 
 
कोरेगाव पार्क येथील ५० हून अधिक हॉटेल्सला नोटीस पाठवून अतिक्रमण काढण्यात आले आहे. प्रेम रेस्टॉरंट (नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क), हॉटेल आथर थीम रेस्टॉरंट (लेन नं.६ कोरेगांव पार्क), हॉटेल पब्लिक (लेन नं. ७ कोरेगाव पार्क), हॉटेल ग्रँइमामाज (कोरेगाव पार्क), हॉटेल एफिन्गुट (लेन नं. ६, कोरेगाव पार्क), हॉटेल डेली ऑल डे (कोरेगाव पार्क), रोटी शोटी कॅफे (वृंदावन बिल्डींग, कोरेगाव पार्क), पिड पंजाब हॉटेल (विमल कुंज अपार्टमेंट, कोरेगाव पार्क), महेश लंच होम (पुणे स्टेशन) या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सुरु राहणार असून पुन्हा अतिक्रमण केले तर पोलिस गुन्हा दाखल करणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विखे पाटील देणार मोठा धक्का, बारा आमदार राहणार सोबत