टाळेबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी सोलापुरातील एचडीएफसी बँकेच्या मेसॉनिक चौक शाखेच्या 13 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अटक करून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणले. लॉकडाऊनच्या काळात ठराविक वेळेपेक्षा अधिक वेळ बँकेचे कामकाज सुरू ठेवल्याबद्दल ही कार्रवाई करण्यात आली.
टाळेबंदी काळात बँकांच्या कामकाजाच्या वेळेत सुधारणा करून सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत बँकेची सेवा सुरू राहण्याबाबत आदेश जारी केले गेले होते. परंतु मेसॉनिक चौकातील शाखेचे कामकाज ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळेपर्यंत सुरूच असल्याचे आढळून आल्यावर कारवाई करण्यात आली.