Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संभाजीनगर मध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

rape
, मंगळवार, 2 जानेवारी 2024 (13:16 IST)
छत्रपती संभाजीनगर मध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने शहर हादरलं आहे. पीडित मुलगी आपल्या आई आणि भावासह राहते. ती पॉलीटेक्निक कॉलेजात शिक्षण घेत आहे. कॉलेज मध्ये तिची ओळख नितीन वाघ या तरुणाशी झाली. त्याने तिचा नंबर घेतला आणि वारंवार तिला फोन करू लागला. तिने त्याला फोन करत जाऊ नकोस असे सांगितले. तरीही नितीन तिला फोन करायचा.

नितीन ने तिला 19 नोव्हेंबर रोजी फोन करून बीड बायपास वर असलेल्या त्याच्या घरी अभ्यासाला बोलावले.पीडित मुलगी आपल्या एका मैत्रिणी आणि मित्रासह त्याच्या घरी अभ्यासाला गेली असता नितीन ने बेडरूम मध्ये नेऊन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कशीतरी त्याच्या तावडीतून सुटून आली. तिने बाहेर येऊन बदनामीची भीतीपोटी कोणालाही काहीच सांगितले नाही. नंतर नितीन ने तिची क्षमा मागितली.  

काही दिवसांनंतर त्याने तिला फोन केला आणि फिरायला जायचे का असे विचारले ती आणि नितीन एका कॉफी शॉप मध्ये गेले. नंतर तिला एक कॉफीशॉपच्या रम मध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार करून तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच हे काहीही कोणालाही सांगू नको असे धमकावले. नंतर मुलीने त्याला फोटो डिलीट करण्याची विनवणी केली. या प्रकारामुळे तरुणी तणावाखाली आली.

सतत ती निजून राहायची तिच्यातील बदल पाहून तिच्या भावाने तिला विश्वासात घेत सर्व काही विचारले असता तिने घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले.आई व भावाने तिला मानसिक बळ देत पोलीस ठाणे गाठले आणि सातारा पोलीस ठाण्यात आरोपी नितीनच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी नितीनवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता, इंजिनिअर ने जेसीबीत बसून अंघोळ केली, व्हिडीओ व्हायरल