Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीड : विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कोचिंग सेंटरच्या दोन शिक्षकांविरुद्ध एफआयआर दाखल

बीड : विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कोचिंग सेंटरच्या दोन शिक्षकांविरुद्ध एफआयआर दाखल
, शुक्रवार, 27 जून 2025 (21:06 IST)
महाराष्ट्रातील बीडमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी कोचिंग सेंटरच्या दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने गुरुवारी शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपी फरार आहे आणि पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. 
तक्रारीनुसार, अनेकवेळस मुलीला या छळाला सामोरे जावे लागले. दोन्ही शिक्षक तिला कोचिंग सेंटरच्या कार्यालयात बोलावून तिला कपडे काढण्यास भाग पाडत असत. त्या अवस्थेत मुलीचे फोटो काढल्यानंतर आरोपी शिक्षक तिच्यासोबत अश्लील कृत्येही करत असत. सततच्या छळाला कंटाळून धाडस दाखवत पीडित मुलीने तक्रार दाखल केली. 
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान मोदी २ जुलैपासून ५ देशांना भेट देणार