मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात दोन वर्षात तीनदा तब्बल १८२६ पानांचे पुरावे देऊन तक्रारी दाखल केल्या. मात्र, तरीही ईडी कार्यालयाकडून कोणतेही कारवाई होत नसल्याने तक्रारदाराने चक्क ईडी कार्यालया समोरच दोन वर्षाचा केक कापत तक्रार दिन साजरा केला आहे. तसेच, आत्ताही कारवाई न झाल्यास आता थेट न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा तक्रारदराने दिला आहे. महेश शंकरपल्ली असे तक्रारदार यांचे नाव असून, ते सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते आहेत.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले आहेत. त्यांनी अनेकांच्या जमिनी हडपल्या असून, मोठे घोटाळे देखील केले असल्याचा आरोप सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते सिल्लोड येथील समाजिक कार्यकर्ते यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. सोबतच त्यांनी आपल्याकडे सत्तार यांच्या कारनाम्याचे पुरावे असल्याचे देखील म्हणाले होते. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप करत महेश शंकरपल्ली यांनी पहिल्यांदा ३१ डिसेंबर २०२१ रोजी ७८४ पानाची तक्रार ईडी कार्यालयात दाखल केली होती. मात्र, कोणतेही कारवाई झाली नाही.
Edited By- Ratnadeep Ranshoor