Publish Date: Fri, 07 Apr 2023 (13:09 IST)
Updated Date: Fri, 07 Apr 2023 (13:13 IST)
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक ०६ एप्रिल २०२३ रोजी हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडला असून दिनांक ०७ व ०८ एप्रिल २०२३ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक दक्षता घेण्यात यावी.असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने केली आहे.