Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maharashtra Weather Updates महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट

cyclone
, शनिवार, 4 मार्च 2023 (11:35 IST)
Maharashtra Weather Updates : कही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरणात सारखे बदलत आहेत. दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्री थंडीची हुडहुडी जाणवत आहे. आता हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांवर संकट ओढावलं आहे. दुसरीकडे गाटपीट होण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 
 
देशाच्या वायव्य दिशेकडून बंगालच्या उपसागरात सागराहून वारे वाहत आहेत. तसेच अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हवामान खात्याने आजपासून 6 मार्चपर्यंत राज्यातील काही भागात अवकाळी पावसासह  (Weather Updates) तुफान गारपीटीचा इशारा दिला आहे.
 
तसेच  6 मार्च संध्याकाळपासून ते बुधवार दिनांक 8 मार्चपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, येवला, नांदगाव, दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तसेच खान्देश, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा (Rain Alert) अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shane Warne Death Anniversary मीस यु शेन वॉर्न