Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 13 March 2025
webdunia

सिलेंडरच्या स्फोटात 24 घरे जळून खाक

सिलेंडरच्या स्फोटात 24 घरे जळून खाक
, शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (11:54 IST)
सिलेंडरच्या स्फोटाने कराड येथील बापूजी साळुंखे पुतळा परिसर हादरून गेला. इथल्या वस्तीत शनिवारी पहाटे भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि या आगीत सिलेंडरने पेट घेत त्यात मोठा स्फोट झाला. या आगीत 24 घरे जळून खाक झाली पण सुदैवाने इथल्या महिलांसह न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कराडच्या न्यायालयाच्या बाजूच्या बापूजी साळुंखे पुतळा परिसरात असलेल्या वस्तीत मध्यरात्री घडली. एका घराला लागलेल्या आगीमुळे ती वाढून आगीच्या भडक्यात चार घरातील सिलेंडरने पेट घेत मोठा स्फोट झाला आणि त्यात 24 घरं मय साहित्याच्या जळून खाक झाले. आग लागलेली पाहता महिलांनी आरओरड करत रस्त्यावर आल्या. सिलेंडरच्या स्फोटाचा जोरदार आवाज आल्याने परिसरात खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांसह प्रयत्न केले. अग्निशमन दलाचे बंब या ठिकाणी दाखल झाले. त्यांचे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु झाले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत झालेल्या नुकसानीमुळे अनेक घर उघड्यावर आले आहे.  
  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ranji Trophy 2022: टीम इंडियातून बाहेर होण्याच्या मार्गावर रहाणे, रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावून फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत