Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या प्रवाशांची बस नदीत कोसळली, 27 जणांचा मृत्यू, 16 जखमी

nepal bus accident
, शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (18:37 IST)
नेपाळच्या मर्स्यांगदी नदीत महाराष्ट्रातील प्रवाशांची बस कोसळली आहे. तनाहूचे मुख्य जिल्हा अधिकारी जनार्दन गौतम यांनी या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तसेच 16 लोकांवर उपचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
बसमध्ये एकूण 40 जण होते अशी माहिती मिळाली आहे. त्यापैकी बहुतांश प्रवासी जळगाव जिल्ह्यातील आहेत.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी याबाबत सचिवांशी चर्चा केल्याची माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांशी सरकारचा समन्वय आहे. त्यांच्या मदतीनं मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असं फडणवीस म्हणाले.
 
याबाबत महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं की, "जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजित 41 पर्यटक हे नेपाळमध्ये दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी गेले होते. त्यांची बस नदीमध्ये कोसळून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे."
अनिल पाटील म्हणाले की, "तातडीने आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रिलीफ कमिशनर उत्तर प्रदेशांना निरोप दिलेला आहे," असंही ते म्हणाले.
 
तसं नेपाळ प्रशासनाला जे मृतदेह सापडले असतील, ते तत्काळ महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यांमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्याचंही पाटील म्हणाले.
जळगाव जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातले भावीकही यात असल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्यात सर्वाधिक आकडा, जळगावमधील लोकांचा आहे.
स्थानिक पोलिसांच्या मते यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. तर अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.
बसची नोंदणी उत्तर प्रदेशातली असून ही बस पोखराहून काठमांडूला जात होती.
ही बस 300 मीटर खोल असलेल्या नदीत कोसळली. ऐनफारा याठिकाणी घटना घडली. अपघाताचं कारण अद्याप समजलेलं नाही.
 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट करत यातील भाविक महाराष्ट्रातील असल्याचं म्हटलं आहे. तसंच काही भाविकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते
हेल्पलाईन क्रमांक
या बस अपघातानंतर काठमांडू येथील भारतीय दूतावासाने आपत्कालीन मदत हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
 
भारतीय दूतावासाने सांगितले की, "पोखराहून काठमांडूला जाणारी एक बस आज मर्स्यांगदी नदीत, 150 मीटर खाली कोसळली. त्यात सुमारे 43 लोक होते. भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने मदत आणि बचाव कार्य पाहत आहे. भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन मदत क्रमांक +977-9851107021 हा आहे."
तनाहूचे मुख्य जिल्हा अधिकारी जनार्दन गौतम घटनास्थळी असून त्यांनी 12 गंभीर जखमींना लष्कराच्या हेलिकॉप्टरनं काठमंडूला उपचारासाठी हलवल्याची माहिती दिली आहे. गेल्या महिन्यातही नेपाळमधून बस अपघाताच्या दोन बातम्या समोर आल्या होत्या.
चितवनच्या सिमलताल येथे भूस्खलनामुळे दोन प्रवासी बस त्रिशूली नदीत कोसळल्या होत्या, त्यात डझनभर लोकांचा मृत्यू झाला.
 
बचावकार्यात अडचणी?
घटनास्थळावरून समोर आलेल्या फोटो आणि व्हीडिओत, मर्स्यांगदी नदीच्या किनाऱ्यावर अपघातग्रस्त बसचे अवशेष दिसत आहेत.
अंबुखेरानी पोलीस स्थानकाचे प्रमुख शिव थापा यांनी, “बस एका विचित्र जागी कोसळली त्यामुळे बचावकार्य करणं कठीण आहे,” असं म्हटलं आहे.
नेपाळच्या गृह मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुखे भीष्म कुमार भुसाल यांनी बचावकार्यासाठी एका मेडिकल टीमबरोबर हेलिकॉप्टर नेण्यात आलं आहे, अशी माहिती दिली.
 
ही बस कुणाची होती आणि प्रवासी कुठे थांबले होते?
डीएसपी भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस केशरवाणी ट्रान्सपोर्टची होती आणि गोरखपूरहून नेपाळला गेली होती.
पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये चालक आणि मदतनीस यांच्याव्यतिरिक्त 40 जण होते.
डीएसपी म्हणाले, "ही बस काल संध्याकाळी 5.03 वाजता कस्टम ड्युटी भरून महाराष्ट्रात दाखल झाली होती. हे 40 प्रवासी महाराष्ट्रातील होते."
सर्व प्रवासी भैरहवा हॉटेलमध्ये थांबले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बसने त्याला पोखरा येथे नेल्याचे भट्ट म्हणाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस आठ दिवसांच्या परमिटवर नेपाळमध्ये दाखल झाली होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माविआ महाराष्ट्र बंद करणार नाही, शरद पवारांनी केले महाराष्ट्र बंद माघारी घेण्याचे आवाहन