मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवारांनी 24 ऑगस्ट रोजी बंद मागे घेण्याचे आवाहन माविआ कार्यकर्त्या आणि जनतेला केले आहे. शरद पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वर आवाहन केले आहे.
शरद पवारांनी लिहिले की, मुंबई उच्च न्यायालयाने बंदला असंवैधानिक मानले आहे. अशा परिस्थितीत उच्च न्यायालयाचा मान राखून उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी पुढे लिहिले की,बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला. दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात समाजात सर्व स्तरातून तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्याचा उद्धेशाने बंद पुकारण्यात आले होते.
मात्र माननीय मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद असंवैधानिक मानला असून बंद माघारी घेण्याचे आदेश दिले आहे. अल्प मुदतीमुळे या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करणे अशक्य आहे. भारतीय न्यायव्यवस्था घट्नात्मक संस्था असल्याने मी सर्वाना विनंती करतो की संविधानाचा आदर करत उद्याचा बंद माघारी घ्यावा.