Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीषण अपघातात ३ जण जागीच ठार, २ गंभीर जखमी

भीषण अपघातात ३ जण जागीच ठार, २ गंभीर जखमी
, मंगळवार, 1 मार्च 2022 (21:02 IST)
नाशिक-पेठ महामार्गावर चाचडगाव परिसरात आयशर ट्रक आणि पिकअप यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृत हे चाचडगावचे रहिवासी आहेत. हा अपघात इतका जबरदस्त होता की, पिकप गाडीचा चक्काचूर झाला. रस्त्यावर तिन्ही तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिककडून गुजरातकडे आयशर ट्रक (क्रमांक एमएच 15 पीव्ही 8934) जात होती. तर, चाचडगावकडून एक पिकअप (क्रमांक एमएच 15 येजी 937) येत होते. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला.  या अपघातात चाचडगाव येथील संतोष हिरामण लांडे (वय 25), हेमंत रघुनाथ मोरे (वय 26), कमलेश सुखदेव मोरे (वय 27) हे तीन तरुण जागीच ठार झाले. तर लखन भगवान गांगोडे (वय 25), रवींद्र वामन पोटींदे (वय 27) यांना नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. .
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यध्यापिकेकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, गुन्हा दाखल