Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 13 January 2025
webdunia

पुण्यातील नवले पुलाजवळील ‘सेल्फी पॉईंट’ येथे भीषण अपघात; 3 ठार तर 12 जखमी, दोघे चिंताजनक

पुण्यातील नवले पुलाजवळील ‘सेल्फी पॉईंट’ येथे भीषण अपघात; 3 ठार तर 12 जखमी, दोघे चिंताजनक
, शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (08:30 IST)
पुणे :  मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरुच आहे. नऱ्हे येथील नवले पुल परिसरातील सेल्फी पॉईंट जवळ गुरुवारी झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, शुक्रवारी  याच ठिकाणी आणखी एक भीषण अपघात झाला असून यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू  झाला आहे. तर 12 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

webdunia
शुक्रवारी रात्री हा अपघात झाला असून एका टँकरने 13 सिटर ट्रॅव्हलरला जोराची धडक दिली. त्यामुळे ट्रॅव्हलर पलटी होऊन सर्व्हिस रोडवर पडली. यावेळी सेल्फी गार्डनमध्ये बसलेले काही नागरिकही जखमी झाल्याचे समजतेय. या अपघातामुळे वाहतुक विस्कळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार असल्याने वेगात असलेल्या मालवाहतूक वाहनांना ब्रेक लावणे अश्यक होते. ब्रेक फेल झाल्याने या परिसरात वारंवार आपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिबवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा – आमदार माधुरी मिसाळ