Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

OMG! 38 वर्षाची महिला 20व्यांदा बाळाला जन्म देणार

OMG! 38 वर्षाची महिला 20व्यांदा बाळाला जन्म देणार
मुंबई- एका दुर्मिळ घटनेत महाराष्ट्राच्या एका महिलेने 20व्यांदा गर्भधारणा केले आहे. डॉक्टरांनी सोमवार ही माहिती देते सांगितले की बीड जिल्ह्यातील 38 वर्षीय ही महिला 7 महिन्याची गर्भवती आहे. आतापर्यंत त्यांचे 16 यशस्वी प्रसव झाले आहे जेव्हाकी 3 गर्भपात झाले आहे. हे गर्भपात गर्भ राहिल्याच्या 3 महिन्यानंतर झाले.
 
डॉक्टरांप्रमाणे त्यांचे 11 मुलं आहे आणि 5 मुलं प्रसव झाल्याच्या काही काळातच मृत झाले. भटक्या गोपाल समुदायाच्या लंकाबाई खराट यांना स्थानिक अधिकार्‍यांनी बघितले, जे त्यांच्या 20व्या गर्भधारणाबद्दल जाणून हैराण होते.
 
बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोराट यांनी सांगितले की आता त्यांचे 11 मुलं आहे आणि वयाच्या 38 व्या वर्षी त्या 20 व्यांदा आई होणार आहे. इतर डॉक्टरने सांगितले की जेव्हा आम्हाला त्यांच्या गर्भावस्थेबद्दल माहीत पडले तेव्हा त्यांना शासकीय रुग्णालयात आणून सर्व आवश्यक तपासण्या केल्या गेल्या. त्या 20व्यांदा गर्भवती झाल्या आहे. त्या आणि गर्भातील मुलं दोघे स्वस्थ आहे. त्यांना औषधं देखील देण्यात आले असून संक्रमणापासून बचावासाठी स्वच्छता आणि इतर गोष्टींचा सल्ला दिला गेला आहे.
 
थोराट यांनी म्हटले की त्या पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म देणार आहे. यापूर्वी त्यांनी घरातच मुलांना जन्माला घातले आहे. कोणत्याही प्रकाराच्या धोक्यापासून बचावासाठी आम्ही त्यांना स्थानिक शासकीय हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला आहे. त्या खराट बीड जिल्ह्यात मजलगाव तहसीलच्या केसापुरी भागात राहतात.
 
बीड जिल्हा कलेक्टरेटहून एका अधिकार्‍याने सांगितले की त्या गोपाल समुदायाशी संबंधित आहे जे अधिकश्या भीक मागणे किंवा मजुरी करणे किंवा इतर लहान-सहान काम करतात. ते एक ते दुसर्‍या जागी जात असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरेतील कारशेडविना मुंबईतील 'मेट्रो 3' अशक्य : अश्विनी भिडे