Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Amravati Accident अमरावती येथील एका कुटुंबाचा सोमवारी भीषण रस्ता अपघात झाला. पीडित कुटुंब वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेऊन परतत होते. परतत असताना जालंधर-पठाणकोट महामार्गावर त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात एका अर्भकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला.
 
जालंधर-पठाणकोट महामार्गावर सोमवारी झालेल्या अपघातात एका 11 महिन्यांच्या मुलीसह अमरावती येथील एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कटरा येथील वैष्णोदेवीचे दर्शन करून हे कुटुंब परतत होते. रायपूरमधील रसूलपूर गावाजवळ आज पहाटे 5.30 वाजता एक भीषण अपघात झाला.
 
हे कुटुंब वैष्णोदेवीहून परतत होते
एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे कुटुंब ह्युंदाई i10 कारमधून महाराष्ट्रात जात होते. यावेळी चालकाचे भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटले आणि टोयोटा इनोव्हा या दुसऱ्या वाहनाला धडकली. यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने कारचा चुराडा झाला. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्ण चक्काचूर झाला.
 
अमरावतीचे रहिवासी गणू (59), त्यांचा मुलगा लोकेश्वर (33), त्यांची पत्नी अनिशा (26) आणि त्यांची 11 महिन्यांची मुलगी निहारिका अशी मृतांची नावे आहेत. पिडीत मुलीचे कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी अमरावतीहून निघाले आहेत.
 
2 जणांची प्रकृती गंभीर
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र सर्वांना मृत घोषित करण्यात आले. त्याचवेळी इनोव्हामध्ये प्रवास करणाऱ्या दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे